STORYMIRROR

Swapna Chaudhari

Others

4  

Swapna Chaudhari

Others

ऋण

ऋण

1 min
507

साजरा करतात सारे

जागतिक महिला दिन

कुणीच फेडू शकत नाही

महिलेने केलेले रीण...


विचार करा आईचा

शक्ती किती ममतेत

सदा आनंदी राहते

बाळ तिच्या छत्र छायेत...


बहिणीची वेडी माया

असते भाऊराया पाठी

धावतच येते सर्वथा

भावाच्या प्रेमासाठी...


आजी तर असते सर्वस्व

सर्व नातवांची लाडकी

त्यांच्यासाठीच पाहा

होते ती खूप बोलकी....


आत्या असो की मावशी

असते खूप गुणाची

मन जिंकून घेते ती

बहीण आणि भावांची...


असीम माया भरली

त्याच्यात सर्व ठाई ठाई

म्हणूनच सदा सर्वदा मी

तिच्याच ऋणात हो राही...


Rate this content
Log in

More marathi poem from Swapna Chaudhari