रीण ( ऋण ) झालं डोईजड
रीण ( ऋण ) झालं डोईजड
1 min
360
रीण झालं डोईजड
कसे फेडावे न कळे
कष्ट करून थकलो
पावसात घर गळे...||१||
लावू किती मी ठिगळं
माझ्या संसाराला गडे
माझे शिवार गहाण
आहे सावकाराकडे...||२||
यंदा वरुण राजाची
होती कृपा दृष्टी छान
डोलू लागले शिवार
दिसे हिरवळ रान...||३||
आला बनुनी हा काळ
असा धो धो बरसला
होत नव्हतं ते नेलं
एकदम कडाडला....||४||
नेत्री दाटले हे पाणी
नाही सरली कहाणी
रीण झालं डोईजड
रडे घरची ही राणी ...||५||
