रंग बरसे
रंग बरसे
🟠सूर्यकिरणांत
असे सात रंग
लाल,निळा,पित
तीन मुख्य रंग
🤎इंद्रधनुष्यात
खेळ सप्तरंगी
नभात बघता
मोद अंतरंगी
🧡निसर्ग रंगांची
सुंदर किमया
एकरूप होती
सहज लिलया
❤️लाल रंग असे
ऊर्जेचे प्रतीक
रंगाचे महत्व
किती अलौकिक
💙निळा रंगातली
भावे विशालता
सागर,नभाची
लाभे शीतलता
💛पिवळा रंग हा
संग अध्यात्माचा
धार्मिक विधीत
मान महत्वाचा
💚हरित हिरवा
रंग सम्रुध्दीचा
मनास भावतो
रंग विकासाचा
❤️गोडुला गुलाबी
असे प्रेमरंग
प्रेमात रंगती
प्रेमवेडे दंग
💙होळीच्या सणाला
*रंगात बरसू*
रंगात न्हाहुनी
गालातच हसू
🤎रंग उत्सवाचा
सण असे मोठा
हेवेदावे सोडा
आनंदच साठा
🤍पांढरा,धवल
रंग हा शांतीचा
शुभ्र रंग असे
प्रिय शारदेचा
🖤काळा व सावळा
श्रीरंग मनात
पांडुरंग रंग
जप ह्रुदयात
💚देशाचा तिरंगा
उंचावितो मान
राष्ट्रध्वज माझा
करूया सन्मान
💜विविध रंगांची
रूपे ही अनेक
एकरूप होता
दिसे अलौकिक
