रडणं शिकव...
रडणं शिकव...
1 min
342
खऱ्याचं खोट करणं शिकव
मला ही खोटंखोटं रडणं शिकव.....
लोकांनी समजलं तू ना दगेबाज
सगळे समजतात मीच चालबाज
मी बदनाम धोक्यात जगणं शिकव....
जीवनात आलीस तिथे येऊ नको
माझ्या सरणावर लाकडं ठेऊ नको
पापण्या मिटेनां मला उठणं शिकव....
का झालो होतो आपण एकमेकांचे
आज ताणे सहन होईनात लोकांचे
हसत दुखाचा घास गिळणं शिकव...
कशी आली नां तुला शर्म
संगमचे का ईतके वाईट कर्म
स्वताच्याचं हाताने स्वता मरणं शिकव....
