STORYMIRROR

रुपाली पाटील

Others

3  

रुपाली पाटील

Others

पूर्णविराम

पूर्णविराम

1 min
221

आपणच ठरवायचं की, कधी द्यायचा पूर्णविराम

उगाचच अर्धविराम वापरत वापरत जगणं ओढतो

नाही त्या व्यक्तींना, घटनांना घट्ट धरून ठेवतो

वेदनांच्या पलीकडे काय मिळतं म्हणून 

वाहून जाऊ देऊयात भावनांना, त्या सगळ्याच वेदनांना

एक एक अश्रू ,एक एक व्यक्ती सोडत जाते.. 

जो खरा आपला त्याला मनापासून स्वीकारू..

मग,कोणी न स्वीकारल्याचं दुःख ना दूर जाण्याचं

म्हणूनच,पूर्णविराम आपणच द्यायचा.

आपल्याला नको असलेल्या आणि 

आपण नको असलेल्या सगळ्याच व्यक्तींना

मनाच्या कोपऱ्यातून काढून टाकून

रिकामं पण आनंदानं गच्च भरलेलं

मन पूर्णविरामानं पूर्ण करून.


Rate this content
Log in