माझा माझ्याच हृदयाशी संवाद
माझा माझ्याच हृदयाशी संवाद
1 min
251
आज ना माझा माझ्याच हृदयाशी संवाद झाला.
काय बोलावं समजत नव्हतं..
खरं तर संवादात आवाज कापत होता,
त्याच्या नजरेला नजर देणं मला शक्यचं नव्हतं
कारणंच तसं...
आयुष्यभर त्याला फक्त तोडण्याचंच काम
मी केलं होतं...
प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी
मारलं होतं..
भरभरून जगायची इच्छा असतांनाही
त्याचं दमनच केलं होतं..
आज माझं मलाच नवल वाटत होतं
कसा कायंच त्याचा विचार आला,
जबाबदाऱ्यांपलीकडे जाऊन त्याचा विचार केला..
अजूनही त्याला राग नव्हताच,
त्याचं आजही माझ्यावर तितकंच प्रेम
अजूनही एक आशा ,
स्वतःला जसं जगायचं तसं जगण्याची..
आणि मला जगवण्याची.
