STORYMIRROR

vaibhav ranadive

Others

3  

vaibhav ranadive

Others

पर्यावरणाचे संरक्षण

पर्यावरणाचे संरक्षण

1 min
225

निसर्गालाच म्हणतात पर्यावरण

परमेश्वराने दिलेले वरदान

मानवा आता तरी जागा हो

जाणून घे प्रदुषणाचे परिणाम ॥


नका टाकु समुद्र, नदीनाल्यांत निर्माल्य

प्रदुषणाने मरून जातील मासे ।

वापरू नका आता प्लॅस्टिक पिशवी

पर्यावरणाला करून टाका आपलेसे ॥

वृक्षाविना जीवन आहे अधुरे

अन्न, वस्त्र, निवारा मुलभुत गरजा भागवितो 

अहो झाडे लावा झाडे जगवा

पावसाच्या रूपाने सजिवांना पाणी पाजतो ॥

चक्री वादळे आली वृक्षे ही पडुन गेली

खुपच हळहळली मानवाची मने ।


प्राणवायु अभावी कोरोना रूग्ण दगावले

कोणालाही नसावी पैशाची हाव।

कावळा म्हणतो काव - काव

माणसा माणसा झाडे लाव॥


द्या कर मानवा आता तरी ऐक

करू नकोस उगाच अटत हास।

देशाच्या विकासाच्या नावाखाली 

खरच होतोय पर्यावरणाचा ऱ्हास॥


औद्यौगिक करणासाठी वृक्षांची केली कत्तल

उंच इमारतीसाठी गावच्या वाड्या केल्या नष्ट।

प्रकल्पाच्या नावाखाली शेतांची लावली वाट

वृक्ष संवर्धनासाठी सर्वानी करू कष्ट ॥


निसर्गातील पशूपक्षी आहेत आपले 

करू नका त्यांचे भक्षण।

परमेश्वरापुढे करू या एकच प्रार्थना

सदैव होऊ दे पर्यावरणाचे संरक्षण ॥


Rate this content
Log in