माझे बाबा
माझे बाबा
1 min
227
बाबा होताची कष्टाळू
करी दिन रात काम l
नाव त्यांचे नरहरी
जपे मनी राम नाम l
भाई होते कलाकार
त्यांना बासरीचा छंद l
वाजवूनी एकांतात
कलेचा घेती स्वानंद ll
कामे केली जंगलात
केली लोकांची चाकरी l
केली समाजाची सेवा
दिली दिनांना भाकरी ll
लाड़ू रव्याचा आवड़े
अन् दूध दही भात l
आवड़ीचा तरीपण
केला लाड़ूनेच घात ll
भाई आठवण येते
कशी विसरेन तुम्हांला l
आहे सुखात सासरी
वंदन करिते तुम्हांला ll
