STORYMIRROR

Nitin Kothawade

Others

3  

Nitin Kothawade

Others

परमेश्वरा...

परमेश्वरा...

1 min
212

परमेश्वरा,

तू अंतरात नि अंतराळातही आहेस...

असे मला शिकवलेय सर्वांनीच.

तू सर्वांचा नियंता आहेस , हेही....


मग मला सांग...


भली मोठी शिळा बरोब्बर आडवी ठेऊन

केदारनाथाचे मंदिर वाचविणारा तू आहेस..

अन् दरडीच्या खाली गावच्या गाव

गडप करणाराही तूच आहेस ?


चांगलं पीक आलंय म्हणून

लेकीबाळींच्या लग्नात लाखो रुपये खर्च करणाऱ्या

शेतकऱ्यांमध्ये तू आहेस.

अन् पिकलं नाही म्हणून कर्जाच्या बोजापायी

जीवन संपविणाऱ्या ʻबळीराजामध्येʼ ही तूच आहेस... ?


मूल होत नाही म्हणून

बुवाबाबांकडे खेटा घालणाऱ्या

निराश दांपत्यांमध्ये तू आहेस..

अन् मुलगी होणार आहे

म्हणून तिला गर्भातच खुडून टाकणाऱ्या

दैत्यांमध्येही तूच आहेस ...?


पैसा,पाठबळ, मार्गदर्शनाच्या जोरावर

यशस्वी जीवन जगणाऱ्या सोम्या-गोम्यांमध्ये तू आहेस.

अन् त्यांच्या अभावी खुरटलेपणाचे जगणे

जगणाऱ्या गुणवंतांमध्येही तूच आहेस..?


सर्वधर्मसमभाव , वसुधैव कुटुंबकम् असे सांगणाऱ्या

संतांमध्ये तू आहेस.

अन् माझाच धर्म खरा, इतरांना जगण्याचा अधिकार नाही

असे सांगणाऱ्या

दहशतवाद्यांमध्येही तूच आहेस...?


परमेश्वरा ...

तू नेमका कसा आणि कुठे आहेस...?


Rate this content
Log in