STORYMIRROR

Nitin Kothawade

Others

3  

Nitin Kothawade

Others

भेद...

भेद...

1 min
132

जातीजातीला अजूनही

वाढतोच भेद आहे...।।धृ.।।


तू मराठा मी महार

मी ब्राह्मण तू लोहार

मनामनामध्ये अजूनही

फाटका ʻमनुभेदʼ आहे

जातीजातीला अजूनही

वाढतोच भेद आहे।।१।।


तुझी साद माझा प्रतिसाद

माझी वेदना तुझी संवेदना

या भावनेला गेला

कुठेतरी छेद आहे

जातीजातीला अजूनही

वाढतोच भेद आहे।।२।।


शिवबांच्या, जोतिबांच्या

बाबासाहेबांच्या नि शाहूंच्या

तसबिरींनाही आता

ʻमहीरपाचाʼच खेद आहे

जातीजातीला अजूनही

वाढतोच भेद आहे।।३।।


परिषदा नि संघटना

तात्या, भाऊ आणि नाना

पुढाऱ्यांच्या सडक्या मेंदूंवरचा

वाढतोच ʻमेदʼ आहे

जातीजातीला अजूनही

वाढतोच भेद आहे।।४।।


जाळपोळ नि लुटालुट

स्थावराची नि अब्रूची

यांचा केला सर्वांनीच

जरी निषेध आहे

तरी....

जातीजातीला अजूनही

वाढतोच भेद आहे।।५।।


एकता आणि समरसता

मानवता नि बंधुता

रे मानवा यातच खरा

जीवनाचा स्वसंवेद आहे...

जातीजातीला अजूनही

वाढतोच भेद आहे।।६।।


Rate this content
Log in