STORYMIRROR

kirti hawaldar

Others

2  

kirti hawaldar

Others

परिस्थिती

परिस्थिती

1 min
107

परिस्थिती,

तू मला तोडून टाक आज,

पण माझ्या रक्ताळलेल्या बुंध्यातून, उद्या पुन्हा येईल हिरवा बहर..

तू मला गाडून टाक मातीत,

पण याच मातीतून उद्या पुन्हा डोकं वर काढतील, असंख्य हिरवे श्वास..

तू माझ्या तोंडाला भलेही आवळशिल लाख मुसक्या,

पण माझ्या अंतर्मनातील सुर, उद्या तुला पुन्हा ऐकू येतील साऱ्या जगाच्या मुखातून,

आणि कदाचित तुझ्याही मनातून..

तुला असेल मारून टाकायची सवय,

पण मला आहे जगण्याचा ध्यास ..

मी सूर्य आहे वेडे,

तुला दिसलो नाही, म्हणजे काही विझलो नाही...     


Rate this content
Log in