STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

4  

Vishal patil Verulkar

Others

प्रेमातील स्वप्न....

प्रेमातील स्वप्न....

1 min
455

आठवतं तुला त्या भेटीत

रिमझिम सरींनी छेडलं होतं,

भर दुपारी मला जणू

चांदण्याने वेढलं होतं...


आठवतं तुला त्या भेटीत

श्रावण धुंद बहरला होता ,

ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने

ओला देह शहारला होता...


आठवतं तुला त्या भेटीत

दोघे व्याकुळ झालो होतो,

तुझा गंध वेचता वेचता

मीही बकुळ झालो होतो...


आठवतं तुला त्या भेटीत

भावनांनी कविता रचली होती,

माझ्या डोळ्यात तू अन

तुझ्या डोळ्यात मी वाचली होती...


आठवतं तुला त्या भेटीत

आणखी काय घडलं होतं ?

मला स्मरत नाही पुढचं

बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं...


Rate this content
Log in