STORYMIRROR

Yogesh Khalkar

Others

3  

Yogesh Khalkar

Others

प्रेमार्थ

प्रेमार्थ

1 min
265

प्रेम म्हणता म्हणता 

प्रेम अनुभवायचं असतं 

नात्यातले भावबंध जपताना 

प्रेम टिकवायचं असतं ||1||


शब्दाला शब्द लागूनही 

एकदिलाने राहायचं असतं 

उगाच भांडत बसण्यापेक्षा 

प्रेम जपायचं असतं ||2||


दूर असलो एकमेकांपासून 

तरी रडायचं नसतं 

आशा निराशेच्या खेळात 

प्रेम जगायचं असतं ||3||


प्रेमात उगाच कोणालाही 

मूळापासून दुखवायचं नसतं 

एकाने रडवलं तरी 

दुसऱ्याने हसवायचं असतं ||4||


Rate this content
Log in