प्रेम
प्रेम
1 min
347
प्रेमासाठी शपथा घेणं
कुणाचंही काम नाही,
जीवासाठी जीव देणं
इतकं काही सोप्पं नाही...
आणाभाका विश्वासाच्या
हृदय मात्र संशयी,
अपेक्षांचे ओझे मात्र
दोघांच्याही डोक्यावरी...
प्रेम खूप त्रास देते
हे कधी ऐकलंय का?
मी तर म्हणते,
त्रास देणारी गोष्ट,
कधी प्रेम असू शकतं का?
जशी झेप घेणाऱ्या पक्षांना
बळकट पंखांची गरज आहे...
तशी निर्मळ खऱ्या प्रेमाला
नितळ विश्वासाची गरज आहे...
