STORYMIRROR

Kajal Barate

Others

3  

Kajal Barate

Others

आस

आस

2 mins
423

तीच वेळ तीच संध्याकाळ

भेट आपली रोजचीच आहे

हात तुझा हाती असावा

हि ओढ सुद्धा रोजचीच आहे

पण तू आहेस तुझ्याच नादात

अन् मी तुझी वाट पाहात आहे...


सांज वेळी गार वारा

अन् आभाळी केशरी छटा

येता जाता घालतोय तो

शीळ आपल्या आठवणींना

तू मात्र गुंग तुझ्याच गर्दीत

अन् मी तुझी वाट पाहात आहे...


स्वप्न तू ध्यास तू

दिवसाची अगदी सुरवात च तू

तुझे क्षण आणि तुझी स्वप्न

ती मात्र दुसऱ्याच पहाटेची आहेत

तू तुझ्या स्वप्नांमागे धावत आहेस

अन् मी इथे तुझी वाट पाहात आहे...


माझ्या नजरेत दरवेळी

फक्त तुझीच लकेर आहे

तुझ्या डोळ्यात मात्र ती

कुणा दुसऱ्याचीच आहे

प्रेम कि वेडेपणा ? काहीच कळत नाही

पण तरीही इथे मी तुझीच वाट पाहात आहे....


Rate this content
Log in

More marathi poem from Kajal Barate