पोळा
पोळा
पोळा
श्रावणात अमावस्या
बैल सण पोळा आला
बळीराजा बाप माझा
सुखानंदी फार झाला
सजवले बैल घरी
शिंगे रंगवली छान
गंध कुंकू लावोनिया
त्यांना मिळे आज मान
झुला ऐनेदार भारी
गळा त्यांच्या छान घंटा
तोडे घुंगरू पायात
नवे दोर नाथी कंठा
वर्षभर शेतावरी
राबतात कारभारी
शेतकरी सखा आज
नाही जाणार शिवारी
बैल भोजन प्रेमाचे
पुरणाची पोळी खास
कृतज्ञता नमस्कार
नैवेद्याचा त्याला घास
बैल जिव्हाळ्याचा सखा
आला घरी अंगणात
श्रम साफल्य वर्षाचे
ढोल ताशा गजरात
बैल पोळ्याचा दिवस
नुसताच नाही सण
प्राणी मनुष्य नात्याची
संस्कृतीची आठवण
श्रीगुरु प्राध्यापक रामकृष्णादादा महाराज पाटील
