पण का?
पण का?
1 min
256
सागराच्या लहरी
असतात पोरी
सूर्याची किरणे
भासतात पोरी
माणुसकीचे दुसरे अंग
असतात पोरी
पण का?
घरा घरात रडतात हो पोरी?
फुलाचा सुगंध
असतात पोरी
दुर्गेच्या रूपातही
भासतात पोरी
माय बापाच्या विश्वासावर
उतरतात पोरी
पण का?
गर्भामध्ये मारल्या जातात हो पोरी?
उन्हा
Advertisement
मध्ये सावलीचा
आनंद असतात पोरी
मायेच्या उंबऱ्याची
मर्यादा असतात पोरी
सासरी प्रकाशाचा
दीप असतात पोरी
पण का ?
गॅसच्या भडक्याने पेटतात हो पोरी ?
अंगणातील तुळस
असतात पोरी
कुटूंबाला नात्यामध्ये
बांधतात पोरी
माय बापाचा अभिमान अन देशाचा स्वाभिमान असतात पोरी
पण का?
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात दुःखी असतात हो पोरी ?