STORYMIRROR

Sonal Nimsatkar

Others Children

3  

Sonal Nimsatkar

Others Children

फक्त सुखाला स्मरून

फक्त सुखाला स्मरून

1 min
221

त्या क्षणांना गुंफलेल्या

कधीतरी मोकळीक दे

भावनांनी विस्कटलेल्या

सावरून क्षणात बहरू दे


मुक्त करण्यासाठी

त्या तुझ्या आसवांना

दूर सारण्यासाठी

ह्या तुझ्या वेदनांना


मुक्त होऊन जगण्याची

मन ठेवून आहेत आस

घेऊ दे त्या क्षणांनाही

पुन्हा मोकळा श्वास


बेभान होवून कधीतरी

जगून बघू दे त्यांनाही 

कितीही नाही म्हटले तरी

आहेत बंदिस्त अजूनही


तुझ्या या जीवनी

फक्त आनंदच रहावा उरून

खूश रहा प्रत्येक क्षणी

हास्याला स्फूरून


मोकळी करून आसवे

दु:खाला जा विसरून

तू आनंदात हसावे

फक्त सुखाला स्मरून


Rate this content
Log in