पहाट
पहाट
1 min
404
आली नवीन पहाट
घेऊन उमंग थाटात
नवीन चाहूल हातात
आली नवीन पहाट
चाफेकळी खुलली
दरवळला सुगंध
सोनेरी किरण घेऊन
आली नवीन पहाट
हिरव्या गवतावर
मोत्याचे दवबिंदू
थंडगार वारा घेऊन
आली नवीन पहाट
देवळात घंटी त्यात
अगरबत्तीचा वास
गोठ्यात धेनू हंबरती
आली नवीन पहाट
