पावसातले बेडूक
पावसातले बेडूक
बेडूक करतो डराव डराव
पाऊस आला सांगतो राव
भिजू नका कोणी होईल
सर्दी ताप खोकला
पाऊस आला साद माझी ऐका
बेडूक सारे पावसाशी बोले
थांब बाबा जरा सांग सारे ओले
सुरकी मारून ओढ्यात जाऊ
थंड पाण्यात उष्ण होऊ
तुडुंब भरले नदी नाले
पावसाच्या भीतीने
सगळे घाबरले.
चार महिने झाल्यावर
पाऊस येईल कमी.
सतर्क रहा हीच मेहरबानी.
पाऊस गेल्यावर सगळे.
शिळ्याखाली जाऊ
बाहेर कोण जाणार नाय
ही काळजी घेऊ
उन्हाळ्यात जास्त
मिळणार नाय भक्ष्य.
पावसाळा असला
पाहिजे बारा महिने फक्त..?
