STORYMIRROR

Sanket Jamkhedkar

Others

3  

Sanket Jamkhedkar

Others

पावसा रे पावसा

पावसा रे पावसा

1 min
225

पावसा रे पावसा सांग ना मला

जीवन तुझ कस आहे

सांगतो रे बाळा,

जीवन माझ तुमच्यासारखचआहे।

रोज बोलणे खाणार,

पडलो जास्त कधी तर

सकाळपासून झालं याच सुरु।

सर्वजण लागतात कुरबुर करू।

पहाड आला, पूर आला,वाहून गेले सार।

दया नाही, माया नाही आपलंच करतो खर।

असच तुम्ही म्हणता ना मी काय करणार आहे।

पावसारे पावसा सांग ना मला जीवन तुझ कस आहे?

पडलो नाही कधी तर,

शेतकरी माझ्याकडे आशेने बघत असतात।

हसन खिदळन विसरून जातात।

बघवत नाही मला त्यांचे असे हाल

कोसळतो मी मग मुसळधार खुशाल।

जमीन म्हणते लवकर मी उन्हात तापते आहे।

पावसारे पावसारे पावसा सांगना मला जीवन तुझं कस आहे।

वाजत गाजत पडलो जर कधी विजेच्या सोहळ्यात तर,

लहान मूल म्हातारी माणस मला घाबरतात।

उठतात दचकून सारे माझ्यावर रागावतात।

आता सांग मला, 

तुमच्यासारखच जीवन कस जगाव मला कळत नाही।

माझ्याच प्रश्नाच उत्तर मलाच कधी मिळत नाही।

माझ्याच प्रश्नाच उत्तर मलाच

कधी मिळत नाही


Rate this content
Log in