माझे बाबा
माझे बाबा
1 min
146
मुलगी झाली म्हणून तू काही नाराज झाला नव्हता बाबा।
पटकन बाहेर जाऊन तूच पेढ्याचा पुडा घेऊन आला होता।
आईची माया नेहमी दिसते परंतु तुझ्या न दिसणाऱ्या हळव्या मनाच काय?
सकाळपासून वणवण भटकून आमच्या जेवणासाठी पैसे कमवून आणणारा,
मायेपोटी रागावणार,कडक शिस्त लावणारा परंतु न मागताच सगळ आणून देणारा।
बाबा घराचा तू भक्कम पाया आहे।
आई घराचं "मांगल्य" तर तू घराचं "अस्तित्व "आहे बाबा।
अबोल तुझ्या डोळ्यात दिसणार प्रेम नेहमी मला कळत बाबा।
तुझ्या लाडक्या लेकीसाठी तू दुःखात पण नेहमी हसतो बाबा।
बाबा तुझ्यावर लिहिण्यासाठी शब्द कमी पडतात।
म्हणून तर सगळे आईवर कविता करतात।
बाबा माझा सुंदर छान।
बाबा माझा अभिमान ।
