STORYMIRROR

Sanket Jamkhedkar

Others

3  

Sanket Jamkhedkar

Others

आला वसंतऋतुराज

आला वसंतऋतुराज

1 min
244

आला वसंत आला

नवी नवलाई घेऊन

दिसे निसर्ग हिरवागार चहूबाजूनं।

ईश्वराने दीला जणू अमृताचा घोट

झाडा पालवी फुटली फुल पान बहरली,पक्षांचा किलबिलाट।

आंब्याची पान जशी छाया देणारी

माय माउली।

तिच्या कुशीत निजली बालिश 

सुंदर परी जशी कैरी।

बघे हळूच डोकावून निसर्गाचे रूप हे साजरे।

द्रीस्ट लागू नये तिला तिचे स्वरूप गोजिरे।

दिसे सुंदर गुलाब त्याला त्याच्या काट्याचा हेवा।

प्रेमाचे प्रतिक म्हणून त्याला मिळाला त्याचा मेवा।

अंगणी गुलमोहर झाड फुलांनी

बहरले।

अशी निसर्गाची किमया स्वप्न वसंतात साकारले।

वाळलेल्या पानांच्या पायघड्या टाकून करी स्वागत वसंतऋतूचे।

झाड बहरले पुन्हा नाजूक कोवळ्या पालविचे।

फुलांचे रंग वेगवेगळे घेऊन सारी सृष्टी बहरली।

येता वसंतऋतुराज निसर्गाची किमया पाहून डोळ्यांची पारणे फिटली,पारणे फिटली।


Rate this content
Log in