पाऊस
पाऊस
1 min
247
आला पाऊस आला पाऊस
सोबत अमृताच्या धारा
ओल्या झाल्या डोंगर रांगा
ओली झाली घरे नी दारे
चिंब पक्षी चिंब झाडे
धरत्रीच्या कणाकणातून
स्वच्छ सुंदर नितळ पाणी
थेंब टपोरे गवता वरती
उड्या मारती डोंगर माथी
धुंद पावसाळी हवा ही
त्याची सखी त्याची सोबती
स्वर्गच झाली धरती ऐसी
नयनरम्य हे दृश्य मनोहर
कडेकपारीतून निर्झर
लोळण घेती खुशाल भुवर
निळ्या मानिकांच्या डोही
. ढगा ढगांची दाटी
ओघळती धरणीवरी
संगे अमृताच्या सरी
उन वाऱ्याच्या साक्षी
दऱ्या खोऱ्यात उतल्या
हिरव्या पाचूच्या नक्षी
