STORYMIRROR

Madhavi Surve

Others

3  

Madhavi Surve

Others

पाऊस

पाऊस

1 min
240

आला पाऊस आला पाऊस

सोबत अमृताच्या धारा

ओल्या झाल्या डोंगर रांगा

ओली झाली घरे नी दारे


धरित्रीच्या कणा कणातून

स्वच्छ सुंदर नितळ पाणी

थेंब टपोरे गवता वरती

उड्या मारती डोंगर माथी


धुंद पावसाळी हवा

त्याची सखी त्याची सोबती

स्वर्गच झाली धरती ऐसी

नयरम्य हे दृश्य मनोहर


कडेकापरितून नीर्झर

लोळण घेती खुशाल भूवर

निळ्या माणिकांच्या डोही

ढगा ढगांची दाटी


ओघळती धरणिवरी

संगे अमृताच्या सरी

ऊन वाऱ्याच्या साक्षी

दऱ्या खोऱ्यात उतरल्या

हिरव्या पाचूच्या नक्षी


Rate this content
Log in

More marathi poem from Madhavi Surve