पाऊस
पाऊस

1 min

85
पाऊस मस्तीत होता
ओल्याचिंब मिठीत घेण्या.....
खिडकीत सरसावला, घोंगावलां अतृप्त नजरेने
ओठ ही स्तब्ध माझे त्याला समोर बघताना....
इशारा त्याचा अंग अंग शहारून गेला
हळूच मला स्पर्शून गेला पैलतिरी....
अनपेक्षित आला सुसाट तो
हरवून मी स्वतःला लपेटून मी त्याला...
रेंगाळताना कधी मी पाहिलं होतं
परसातली जाई जुई, पारिजाताशी बोलताना.....
नितळ निळ्या आभाळी स्वच्छ दिसला कोसळताना
झुळझुळ वाहत्या नदीशी, फेसाळत्या लाटांशी हितगुज करून आला.....
त्याच उमेदीने निरागस मनानं
परत फिरताना कळवळला दूर जाताना.....