STORYMIRROR

Chaitrali Kulkarni Adhye

Others

3  

Chaitrali Kulkarni Adhye

Others

पाऊस आणि मी

पाऊस आणि मी

1 min
23

पावसाचं एक बरं असतं, त्याला कुणाच बंधन नसतं

मनात येईल तेंव्हा बरसायचं आणि मनात येईल तेंव्हाच थांबायचं.

बरसता बरसता इतकं बरसायचं मनी दाटलेलं क्षणांत मोकळं करायचं.

भेगाळलेल्या भूईला असं कवेत घ्यायचं जणू भेगाळल्या मनाला हळुवार फुंकरावं.

सुकलेल्या वनचरांवर असं ओथंबायचं हरलेल्या मनाला जणू नव संजीवन मिळावं.

कधी कधी असं वाटतं तुझ्यात इतकं भिजावं तुझी सर आणि माझी आसवं ह्यात अंतर न उरावं.                    

तु अन् मी जणू समदु:खीच असावं तू बरसावं नभातून मी बरसावं डोळ्यातून.

बरसता बरसता एकरूप व्हावं तू माझ्यात अन् मी तुझ्यात न्हावं


Rate this content
Log in