पाखरू हरवलं
पाखरू हरवलं
1 min
273
पाखरू हरवलं, कुणास ठाऊक
कुण्या घरट्यात, जाऊन दडलं
जीवघेण्या यातना,पदरी देऊन
कुण्या फूलाच्या, मुशीत शीरलं
पाखरू हरवलं पाखरू हरवलं....(१)
होतं बांधलं, विश्वासाचं नातं
होतं सुरळीत, न्यायचं नातं
होती मंजुळ , कोकिळ गितं
द्रुष्ट कुणाची , तोडून गेलं
पाखरू हरवलं पाखरू हरवलं (२)
पुणवेच्या राती,
कुण्या फूलाच्या संगती,
रंग ओसरून माझे,
रंग तयाचे भरत गेलं
पाखरू हरवलं पाखरू हरवलं(३)
प्रेम जीवापाड केलं,
वाटे मनास तेंव्हा कुचलून दिलं,
ह्रदयीच्या विश्वासरूपी विटेवरी,
आघात जोराचा करून गेलं...
पाखरू हरवलं पाखरू हरवलं(४)
