STORYMIRROR

प्रीती वाडीभस्मे

Others

4.2  

प्रीती वाडीभस्मे

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
32


लाही लाही झाली अंगा 

झाली कोरडी धरणी 

आस लागली रे जीवा 

आता यावी वर्षाराणी...


चातकाची आतुरता 

बळीराजा व्याकुळता 

कशी नाही दिसें तुला 

बालकांची उत्सुकता....


आता तरी सोड राणी 

तुझा नाहकच हट्ट 

अशी ये ग बरसुनी 

मिठी मातीस दे घट्ट...


वृक्ष, वेली, पाने, फुले 

भिजू दे पालापाचोळा 

थेंब टपोरा झेलुनी 

नाचू दे ग मुलाबाळा... 


नभोमंडपी नक्षत्र 

इंद्रधनुचे फुलवं 

प्रेमी वीरांना थेंबाच्या 

हिंदोळ्यावर झुलव...


गहिवरून पाऊस 

अश्या बरसल्या धारा 

भावनांच्या आवेगात 

झोके घेतो मस्त वारा....



Rate this content
Log in

More marathi poem from प्रीती वाडीभस्मे