न्याय
न्याय
1 min
178
आपल्या हक्कासाठी लढवूनही
अनेक आंदोलन करूनही
पूर्ण हक्क मिळतो का?
सांगाना न्याय मिळतो का?||१||
शेतकरी एवढ कष्ट करूनही
कर्ज घेऊन धान पिकवनूही
त्या धान्याचा मोबदला मिळतो का?
सांगाना न्याय मिळतो का?||२||
कागज पत्रासाठी लाईन लावूनही
कोणालाही काही लाच न देता
काम करून मिळतो का?
सांगाना न्याय मिळतो का?||३||
विद्यार्थीनी क्रमांक मिळून ही
काही देणगी न देता
शाळेत प्रवेश मिळतो का?
सांगाना न्याय मिळतो का?||४||
चांगले शिक्षण होऊनही
कोणतेही शिफारीश न करता
रोजगार कोणाला मिळतो का?
सांगाना न्याय मिळतो का?||५||
