निसर्गचित्र
निसर्गचित्र
1 min
241
उगवती भानू पाहा लाल रंग लेवूनी
भासती दाहीदिशा सौंदर्य तनू कामिनी
किरणकोवळी प्रभा विलसते नभोपरी
उजळविती भूमीला आदित्य हा चराचरी
हरितकंच शालूने भासते वधु धरा
आनंद रोज प्रसविती नवनवी वसुंधरा
ध्यानस्थ मग्न वाल्मिकी बनूनी हा उभा तरु
रम्य पुष्प खेळती कळ्यासवे वेलीवरु
विहंग विहरती नभी ठाव घेत अंतरी
शोधू पाही आसरा विसावणया वृक्षांवरी
तरंगिणी खळाळती पात्र भरुनी वाहती
शुभ्र शंख शिंपले काठावरी स्थिरावती
उंच शिखर पर्वते तटस्थ उभी राहती
विशाल या वसुंधरेचे रक्षक जणू वाटती
मधुर रस रसरसे परिपक्व या फळांतूनी
वायू खुशाल वाहती सळसळी पिकांतूनी
लावण्यवती ही धरा मिरविती सृष्टीत या
मीच एकटी इथे स्पर्धा कुणाची नच मला
