Shamrao Sutar

Others

4.6  

Shamrao Sutar

Others

निसर्ग हाच देव..

निसर्ग हाच देव..

1 min
513


आषाढात जोरात

पडणारा पाऊस

श्रावणात बरसतोय

सगळंच बदलतंय ।।१।।


आणि श्रावणातल्या

रिमझिम श्रावण सरी

आषाढात बरसतात

निसर्गच बदलतोय ।।२।।


निसर्गाचं बदलनं

माणसासारखेच झालयं

पण, निसर्ग जरी

बदलला, तरी तारतोयं ।।३।।


माणसा एवढे तरी

समजू दे तुला

असू देत भान

असं तुला सांगतोय..।।४।।


निसर्गावरचं अतिक्रमण

थांबवशील तर,

तोच आपोआप

समतोल सांभाळतोय..।।५।।


या कोरोनाच्या काळात

सर्वच दळणवळण

बंद असल्याने..निसर्गानं

स्वत:ला संतुलित केलंय..।।६।।


नियंत्रित झालंय

हवेतील प्रदूषण

म्हणूनच मानवा तू

मोकळा श्वास घेतोस..।।७।।


झाडे लावा, झाडे जगवा

वनराईत हिरवाई फुलवा

प्राणवायूचा पुरवठा होत रहावा

म्हणून, वृक्ष संपत्ती वाढवा..।।८।।


हर्षोल्हासित जीवन जगण्यासाठी

वृक्षवल्लीशी नाती जोडा

मिळेल आरोग्य संपदा

अनुभवूनी पहा एकदा..।।९।।


सुखी समाधानी आरोग्य

हिच संपत्ती समजून,

निसर्गाशी जोड नाते

जीवनातील आनंद...कर व्दिगुणीत।।१०।।


निसर्ग हाच देव

मानूनी पहा एकदा

हेच माझे मागणे

तुझ्या कडे माणसा..।।११।।


Rate this content
Log in