STORYMIRROR

Shamrao Sutar

Others

3  

Shamrao Sutar

Others

निसर्ग सौंदर्य..

निसर्ग सौंदर्य..

1 min
171

माणसा किती करशील

हव्यास अन् उपद्व्याप

धनसंचय करून घालशील

कुणाच्या तरी घशात ।।१।।

आलास रिकाम्या हाताने

जाणारही आहे..तसाच

मग, कशाला करतोस

एवढा हव्यास, रहा निवांत ।।२।।

निसर्गाने दिलेल्या सौंदर्याच

कर संरक्षण व संवर्धन

अनुभवून बघ एकदा

यातच आहे तुझं हित ।।३।।

निसर्ग देतोय तुला फुकट

ओक्सिजन अन् ओझाॅन वायु

लावलीस झाडेझुडपे व केलंस

संगोपन तर.. राहिल निरंतरता ।।४।।

फुकट सर्व मिळत म्हणून

मोल करा त्याच

ऋणी व्हा निसर्गाचं

अन् निरोगी रहायचं असतं ।।५।।

झाडे लावा झाडे जगवा

हाच मनी असावा ध्यास

मोकळा घेता येईल श्वास

निसर्ग देईल मेजवानी खास ।।६।।

महामारी रोगराई होणार नाही

पळून जातील तुमच्या पासून

दोन-चार हात धन्वंतरीचा

वरदहस्त लाभेल मानवास..।।७।।


Rate this content
Log in