नभांगण
नभांगण
1 min
411
नभांगणात शुभ्र
पडे चांदण्याचा सडा
जणू हिऱ्या मोत्यांनी
सजला आकाश वाडा ।।
नवरत्ने जडली अंगी
चंद्रकळा सजली
नभांगणी तारका बसविली
मनी हसून गोड लाजली ।।
काजव्यांची दीपमाळ
हिरे, माणके दिसले
ते बघून भूवरील
ऋषीमुनी हसले ।।
नभी शोभे इंद्रधनुष्य
जणू रंगीत रांगोळी
कवितेची त्याप्रमाणे
कल्पना आगळी वेगळी।।
