नभांगण
नभांगण
1 min
273
विस्तीर्ण विशाल नभांगणी
तारका खेळ खेळती
आपुल्या जवळी नसूनी
युगायुगांचे नाते पाळती ||1||
नभांगणी सदा राहुनी
सूर्य-चंद्र कार्य करती
चंद्र सूर्याच्या कार्यातूनी
जीवन उजळून जाती ||2||
युगायुगांच्या अतूट नात्यातूनी
बंध बांधीत जाती
प्रेम माया आपुलकीतुनी
आधारस्तंभ जीवनाचे बनती ||3||
