STORYMIRROR

Yogita Bhopale

Others

3  

Yogita Bhopale

Others

Nati Goti

Nati Goti

1 min
747

               

      प्रत्येकाच्या आयुष्यात नाती येतात

       जीवनातील कर्तव्याची जाणीव ती देतात.

          नात असत मुलाशी आईचं

          जणू काही ते दुधावरच्या सायीचं,

       पण एक क्षण येतो असा 

       मातृत्वाच्या पंखाखालून भरारी घेण्याचा

      जीवनरूपी पिसारा फुलविण्याचा II१II

        याच वळणावर गरज असते 

        पितृत्वाच्या प्रेमळ छायेची 

       त्यांच्या कतृत्वाच्या आदर्शाने 

       भावी जीवनाची दिशा ठरविण्याची II२II

    नात असत बहिणी बहिणीच 

    जणू काही ते स्नेहपूर्ण मैत्रीच 

    इथच सार हितगुज घडत 

    मनीच गुपित हळूच कळत II३II

        नात असत भावाच भावाशी 

    कधी असत ते स्नेहाच तर कधी क्लेशाचे

      एकमेकांपासून दूर होण्याच 

      दुराव्यातही आतुरता शोधण्याच II४II

     नात असत पती पत्नीच सात जन्माची साथ निभावण्याच 

     आणा भाका घेण्याच, सुख दुःखात साथ देण्याच 

     भावी पिढी निर्माण करण्याच 

     संसाररुपी नौका पैलतीरी नेण्याचं II५II

    पण मित्रांनो या सर्वाहुनी  

  असत एक आगळ वेगळ नात 

  ते असत माणुसकीच, ते असत माणुसकीच

  हे नातं जपता जपता आदर्श नागरिक होण्याचं II६II


Rate this content
Log in