नातं स्त्रीच समाजाशी
नातं स्त्रीच समाजाशी
नातं स्त्रीच समाजाशी
स्त्री जे एक नात आहे.
ज्याला अनंत नाव आहेत पण सीमा नाहीत
अस नातं ज्यात आहे सागराची गंभीरता
आणि गगनाची विशालता.
ज्यात प्रेम आहे आणि भावूकता
अस एक नात, जस डोळ्याशी स्वप्नाचं असत
जस चंद्राच शितलतेशी असत
तस हे स्त्रीच नात समाजाशी .
अस एक नात सुर्याहूनही तेजस्वी
अन मोदाहून ही थंड
फुलांहूनही नाजूक व पाषाणाहून ही कठोर
अस हे नात समाजाशी
अस एक नात ज्यात अपेक्षा आहेत आणि त्यागही
अस एक नात ज्यात विणेचे मयूर स्वर आहेत
व बन्सीची मोहक ताण ज्यात आहेत हास्याचे तुषार
अन अश्रुंचे श्रावण
अस हे स्त्रीच नात समाजाशी
अस एक नात तुझ्या माझ्यासाठी आहे एक वरदान
सर्वार्थाने खर आणि प्रामाणिक
पण आजच्या जमान्यात, आपणच हे नात नष्ट करण्यास
स्त्रीच नात समाजाशी आहे असच घट्ट ठेवण्याच
जस उचलल होत पाउल आपण्यासाठी
आंबेडकर, फुले, राजाराममोहन राय यांनी
आपल समाजातल स्थान सुधारण्यासाठी
नाही विसरून चालणार आपणास
आपला वसा, सावित्रीबाई आणि रमाबाईंचा
ज्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि आदर्शानी
आपण घेतला आहे ठाव साऱ्या जगताचा
पुरुषप्रधान संस्कृती, प्राचिन काळी पुरुषांच्या
हातातील बाहूल असणारी स्त्री, अन सर्वच
अनादी काळापासूनची अगाधशक्ती अशी जिची
ओळख पावलोपावली जाणवत आहे.
म्हणूनच आजच्या या महिलादिनी
घेऊया आण स्त्री संविधानाची, घेऊया आण स्त्री संवर्धनाची
स्त्रीच समाजातील नात कायम ठेवण्याची
स्त्रीच समाजातील नात कायम ठेवण्याची
