नातं
नातं
1 min
303
नात्या तुझी लक्तरं रं वेशीवरी टांगली
जीव ग्येला सांधायाला वाट न्हाई भावली
सांगतुया याले त्याले माझा व्हता उंडगा
सांगताना पान्याले त्या कडा न्हाई गावली
मनाच्या त्या नदीला त्यो पूर पुन्हा लागला
सोसले वारे परी भावना न्हाई सोसली
जीवनी माझ्या मी ह्या घाव पाहिले जुने
सांगे दिमडी म्हने म्यां कदी न्हाई घेतली
सोसले असेल आमीबी फर्ज ते होते म्हने
जन्माया घाला मले सांगुनी न्हाई घातली
जगताना जिमिनीले भगदाड भले टोणगे
फुलवला जीव तिन्हं आस न्हाई सोडली
जगतुया म्हाहित न्हाई काय केला गुन्हा
श्वास फिरे घरामंदी मान्सं न्हाई चांगली
नात्या तुझी लक्तरं रं वेशीवरी टांगली
जीव ग्येला सांधायाला वाट न्हाई भावली
