नारीशक्ती
नारीशक्ती
1 min
688
नारी जन्म किती महान.
सृष्टी निर्माण केली छान.
तूच आई बहिण सखी.
सुख देई जगा वरदान.
तूच बहिण ज्ञानियांची
गुरू चांगदेवाची मुक्ताई.
तूच घडविला शिवाजी
अन तूच राणी लक्ष्मीबाई.
दिवा ज्ञानाचा घरोघरी
तूच लाविला सावित्रीबाई.
दगडांचा मार खाऊन
जगी दिला आदर्श बाई.
तूच वाहिली धुरा देशाची
जगात शान तुझी इंदिराई.
ओव्या गाऊन तू मुखात
जगी ज्ञान दिले तू बहिणाई.
घेई गगन भरारी जगतात
सुनिता अन कल्पना चावला .
तूच नारी कर्तृत्वशाली खरी
नच असे तूग आता अबला.
आहे मी ज्योती मी सावित्री
नाही आता कुणाला भिणार.
संघर्षाच्या वाटा तुडवत
गगनात भरारी घेणार.
