मुलगी असता घरी
मुलगी असता घरी
1 min
583
सुख मिळे नानापरी
दोन्ही कुळांना उध्दारी.
मुलगी असता घरी
हर्ष आनंद देणारी.
आई बहिण लेक पत्नी
नाते निभवते अनेक.
जन्मभर त्याग सुखाचा.
गुणगान असते लेक.
स्वामी तिन्ही जगाचा
आईविना झाला भिकारी.
येऊन लक्ष्मी रूपाने
घराला घरपण देणारी.
होउनी पणती समई
घराला उजेड देणारी.
करी अंधार दु:खाचा
सतत असते तेवणारी.
संस्कार करूनी घडविला
अर्जुन शिवाजी जगात.
जिजाऊ कुंती कौसल्या
देव जन्मला उदरात.
