नारी
नारी
1 min
251
आजची नारी
सावरली छान
जगातही मान
पडते भारी १
नाही अबला
ती कर्तृत्ववान
आहे गुणवान
झाली सबला २
गुणांची खाण
करा हो आदर
प्रेमात सादर
ठेवावी जाण ३
घरास सुखी
द्या रे प्रेमभाव
गुणांना द्या वाव
नकोच दुःखी ४
काळजी घेते
तुमची सर्वांची
पर्वा ना कष्टांची
प्रेमही देते ५
असो माहेर
लुटते ती माया
सासरीही छाया
प्रेम आहेर ६