STORYMIRROR

Sunita Padwal

Others

3  

Sunita Padwal

Others

मृदुगंध ओल्या पावसाचा

मृदुगंध ओल्या पावसाचा

1 min
214

नील अंबरी पावसाची छबी

घन पिसाट वाऱ्यात नभी 

उभ्या पिकात हिरव्या रानात

सृष्टी सुसाट तोऱ्यात उभी ||१||


आला पाऊस भिजली धरती

शुभ्र गोरे गोरे थेंब

सरीवर सर ओथंबून 

रविकिरणेही झाली ओली चिंब ||२||


ऋतू हर्षाचा ऋतू वर्षाचा

मृदुगंध ओल्या मातीचा

सुगंधित झाला आसमंतसारा

मृदुगंध भिजक्या पावसाचा ||३||


रिमझिम बरसती पाऊसधारा

संगे ओला गार वारा

रुप देखने सजली धरा

हिरव्या ऋतूचा नवा कारवा ||४||


मृदुगंध चिंब पावसाचा

गंधाळीत बेभान वारा मोहवीत

बंधन नसे कुणाचे

ओलं रुप सुखवीत ||५||


ओला मृदुगंध मुग्ध हिरवं रान

सप्तरंगी इंद्रधनू बेधुंद उधळण

मन आलं बहरुन ऋतू हिरवा बघून

धरती तृप्त पाऊस पिवून ||६||


Rate this content
Log in