मृदगंध पावसाचा
मृदगंध पावसाचा
1 min
237
सर्वत्र सुरू आहे
पावसाचे वातावरण
आनंदी करतो तो
सर्व वातावरण
प्रफुल्लित होते मन
रोमांचित होते तन
शहारते अंग अंग
सृष्टी होते ओलीचिंब
मृद्गंध पावसाचा
भिडतो मनामनाला
अत्यानंद होतो मनी
येथे क्षणाक्षणाला
स्वर्गीय आनंद लाभे
माझ्या मनाला
लाभ होतो येथे
प्रत्येक कणाला
यावा पुन्हा-पुन्हा
हा ऋतू
सर्व सजीवांना दे
जीवनदान तू !
