मिलन
मिलन
1 min
204
तार छेडता गोड सूर निघती
मनोमिलन होता तार छेडती
प्रेमाचे सार प्रेमप्रेम निघती
प्रेम शब्दाचा भारी सारे बघती
मुले-मुली नि फुले खूप नटती
कळींची फुले उमलती फुलती
आल्हादिता ती पाण्यात चिंबती
चिंबल्या मनाची ओल सुजलती
रेखीव तन सौंदर्य खुलविती
प्रेमात न्हाऊ चला सारे विरती
मनी असे सुंदर भगवती
गोडी चाखू दोघांत एकरूप ती
एकीत असे मजा बेकीत सजा
विरहात दुःख आनंदातच रुजा
जा माफ केले तुला तू कर मला
प्रेमी आलिंगू एक होऊन ती कला
मदमस्त होऊन जगू आपण
होऊन खूपच नसे मी तू कृपण
खरे रूप दाविता कुणी दर्पण
कशाला हवा आम्हा मानापमान
एक पाऊल पुढे तुझे नि माझे
वाहू दोघे मिळून संसारी ओझे
विरह सहवेना मला नि तुला
गोडी अमृतापरी प्रितीचा कडा
