मी शिक्षक
मी शिक्षक
1 min
390
कल्ले-हल्ले, युद्धवार्ता
बाँबस्फोट, धरपकड, असुरक्षितता
भोवतालचा कोलाहल
सारा दूषित माहोल
मी रोज बघते
मी जराही विचलित होत नाही
रोज सकाळी सामुराई योद्ध्याप्रमाणे
मी बाहेर पडते
खडूचे शस्त्र नेम धरून फळ्यावर ताणते
अद्न्यानाच्या राक्षसाचा अचूक वेध घेत
मी घाबरत नाही
कुठल्याच अस्थिर किंवा सडलेल्या व्यवस्थेला.
मला खात्री आहे
मुलं दप्तर उघडून अभ्यासाला बसतील
तेव्हा
ज्ञानाचे तेजस्वी किरण वेगाने
बाहेर पडतील.....
सारा अंधार भेदून जातील....
मी निश्चिंत आहे
कारण मी प्रत्येकाच्या दप्तरात
ठासून उजेड भरला आहे
