मी मूर्ख शिरोमणी
मी मूर्ख शिरोमणी

1 min

69
मी मूर्ख शिरोमणी जगातला,
हातचे कधी राखलेच नाही
माझ्या नशिबी आंबट सारे मी
गोड कधी चाखलेच नाही
सुखाच्या सरी किंचित कोसळल्या,
दुःखसागर मात्र आटलेच नाही
डोळ्यांचे झरे अविरत वाहिले मी,
त्यांचे मात्र कधी दाटलेच नाही
आत्ममग्न जगात या मी,
स्वार्थ कधी जपलेच नाही
निस्वार्थ खपलो बाजारी,
माझे प्रेम मात्र खपलेच नाही
व्याकुळ मनाच्या वनात माझ्या,
मोर कधी नाचलेच नाही
सांगायचे होते जे मला,
डोळ्यात कोणी वाचलेच नाही