STORYMIRROR

Aarti Mishra

Others

3  

Aarti Mishra

Others

मी जगयला शिकले

मी जगयला शिकले

1 min
14.6K


मी जगायला शिकले


मी जगायला शिकले

वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर

मी आता जगायला शिकले

मैत्रिणी बरोबर हसायला शिकले

आपल्या मनासारखे जगायला शिकले.

जीवनाला खुप बारकाईने समजल्यानंतर

आता मी त्याला जसे आहे तसे स्वीकारायला शिकले

कुणालाही आपल दुख न सांगता

हसता हसता जगायला शिकले.

जीवनाचे कोडे पडल्यानंतर

त्याला सहजपणे सोडवायला शिकले

लोकांच्या चेहऱ्यातला लपलेला खोटा चेहरा समजून गेल्यानंतर

न रागवता आता त्याना संथपणे हाताळायला शिकले.

कोणी कितीही नावे ठेवली

तरी आपल्या मनासारख जगायला शिकले

खरच आता जीवनचा खरा अर्थ कळल्यावर

आता माझ्या स्वतःसाठी 

मी आता जगायला शिकले.


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ