महागाई
महागाई
1 min
293
जेव्हापासून भ्रष्टाचार आणि
राजकारणाची झाली सगाई
तेव्हापासून भारत देशात
भरमसाठ वाढली महागाई
महागाईने आपले क्षेत्र
दिवसेंदिवस वाढवितच नेले
अन्याय हिटलरचे
जणू पुन्हा सुरू झाले
इच्छा नसतांना महागाईला
सहन करावे लागते
श्रीमंताचे जाऊद्या
पण गरिबांना तडा बसते
महागाईला वश करणे
फार कठिण काम दिसते
सरकारचे प्रत्येक औषध
या रोगांवर फेल वाटते
पसरून साथीच्या रोगां सारखे
महागाईने किती केला कहर
गरीब गेला मरायला तर
दुकानदार म्हणे विकत घ्या जहर
फरक नाही पडत नेत्यांना
महागाई कमी झाली की नाही
पण शेतकऱ्याला विचार पडतो
आज घरी चूल पेटणार की नाही.
