STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

4  

Vishal patil Verulkar

Others

मायी माय

मायी माय

1 min
302

मायी माय कामाले जाते

जाता जाता मले चाराने देते...!!


मायी माय पराट्या काढते 

मले सावलीत राय म्हनते,

आपुन पाणी पिऊन घेते 

मले भाकर करुन देते,


मायी माय कामाले जाते 

जाता जाता मले चाराने देते...!!


पदर बाबूईले लटकते

दांड लुगड्याले भरते,

आपुन ऊनत सोसन करते

मले कालेजात जाय म्हनते,


मायी माय कामाले जाते

जाता जाता मले चाराने देते..!!


गाठी लुगड्याले बांधते

पैसे डिरेसाले देते,

तिच्या मनात विचार येते

माया जिवाची कदर करते,

     

मायी माय कामाले जाते 

जाता जाता मले चाराने देते...!!


घरातून बाहेर येते

आपुन सळासारोन करते,

फाटक्या वाकईवर सपन पायते

मले आफीसर होय म्हनते,


मायी माय कामाले जाते 

जाता जाता मले चाराने देते...!!


Rate this content
Log in