STORYMIRROR

Raghunath Dhawad

Others

3  

Raghunath Dhawad

Others

मायेचा पदरी

मायेचा पदरी

1 min
134

तुझ्या पदराची छाया

माझ्या डोईवरी माते

मनी चैतन्याचे बीज

तुझ्या कृपेने रूजते . ॥1॥


तुझ्या अंगाईचे गीत

भूल दु:खाची पाडते

तुझा निर्मळ पान्हा

अमृतास लाजवते . ॥ 2॥


तूझे मायेने गोंजारने

ममतेची साक्ष देते

तुझ्या आठवणी साऱ्या

भेट विठुरायाची घडवते .॥3॥


आई तुझ्या चरणावरीड

माझे मस्तक ठेवते

तुझ्या पडराच्या आड

सारे विश्व सामावते .॥4॥


Rate this content
Log in